...म्हणून गणपती बाप्पाला 21 मोदकांचं नैवेद्य दाखवला जातो; जाणून घ्या नेमकं कारण काय?
गणपती बाप्पाचा उत्सव सुरु झाला आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होत आहे. गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. गणपती बाप्पाला मोदक आवडण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच आहे. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य का दाखवतात?ही संख्या कोणी निश्चित केली? शास्त्रात त्याला काही पुरावे आहेत का? जाणून घ्या.
पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चार्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती. पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते. म्हणजे लोकांना मारायचे. ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला. कंसाचा हनन करण्यासाठी कृष्णानी जन्म घेतला. तसेच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला.
देवांतक आणि नरांतक द्या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार ना. त्यासाठी विनायक बाप्पांनी 20 सैनिक घेतले. तर आता 20चं का? कारण पूर्वीच्या काळी 10 हाताची बोटं आणि 10 पायाची बोटं असे मिळून 20 होते. तेव्हाच्या काळी 20 या आकड्यांमध्येच मोजणी व्हायची. म्हणून त्यांनी 20 सैनिक घेतले. त्या 20 गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा. तर असे 20 अधिक 1 म्हणजेच 21. म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात. बाप्पाचं सगळे 21 मोदक खातं नाहीत. बाप्पा हा एकच मोदक खातो. पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते 21 मोदक, 21 लाडू, 21 दुर्वो, 21 करंजा असं आपण 21 आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो.